पंचतत्त्व व पंचांग (10 Sessions)

Last Update April 12, 2026
5.0 /5
(16)
27 already enrolled

About This Course

अभ्यासक्रम तपशील
१. ज्योतिष शास्त्र म्हणजे काय?
• त्रिकालज्ञान — भूत, वर्तमान व भविष्य यांची समज
• Qualitative Time म्हणजेच वेळेची गुणवत्ता ओळखण्याची कला
• “ऊर्जा + समय + अवकाश = ज्योतिष” या मूलभूत तत्त्वाचा अभ्यास
________________________________________
२. पंचांग — ज्योतिषशास्त्राचा प्राण
• पंचांगाचे वैदिक आणि दैनंदिन महत्त्व
• दैनंदिन जीवन, निर्णय आणि क्रियांमध्ये पंचांगाची भूमिका
• भारतीय परंपरेतील पंचांगाचे स्थान व उपयोग
________________________________________
३. ग्रेगोरियन कॅलेंडर विरुद्ध भारतीय पंचांग
• दोन्ही दिनदर्शिकांमधील संरचना आणि पद्धतीतील महत्त्वाचे फरक
• चांद्र–सौर वेळमापनाची वैज्ञानिक पद्धत
• महिने, ऋतू, संक्रांती, नक्षत्र यांचे स्थान व अर्थ
• ज्योतिषीय दृष्टिकोनातून सखोल तुलना
________________________________________
४. पंचतत्त्वांची ओळख व ज्योतिषातील भूमिका
आकाश – वायु – अग्नी – जल – पृथ्वी
• विश्वाची मूलभूत रचना
• तत्त्वांचे मानसिक, ऊर्जात्मक व आध्यात्मिक अर्थ
• जन्मकुंडलीतील पंचतत्त्वांचे संतुलन कसे तपासावे?
________________________________________
५. पंचतत्त्वांचा सखोल अभ्यास
आकाश तत्त्व: अवकाश, विस्तार, शून्यता, नाडी, प्राण
वायु तत्त्व: गति, मन, विचारप्रवाह, संवेदना
अग्नी तत्त्व: तेज, जाणीव, परिवर्तन, पाचनशक्ती
जल तत्त्व: भावना, प्रवाह, स्मरणशक्ती, संवर्धन
पृथ्वी तत्त्व: स्थैर्य, शरीर, प्रत्यक्षता, भौतिकता
✔ नैसर्गिक उदाहरणे
✔ शरीर–मन संबंध
✔ वैदिक तत्त्वज्ञानाशी जोड
________________________________________
६. पंचांग — पाच अंगांचा प्रायोगिक अभ्यास
• वार: ग्रहाधारित दिवसांचे गूढ
• तिथी: सूर्य–चंद्र कोनातील बदल व त्याचा परिणाम
• नक्षत्र: चंद्रभावना आणि ऊर्जेचे आयाम
• करण: दैनंदिन कृतींचे शुभत्व
• योग: सूर्य–चंद्र ऊर्जेचा संयुक्त प्रभाव
✔ शुभ-अशुभ योगांचे प्रकार व उपयोग
________________________________________
७. पंचतत्त्व व पंचांग आधारित कुंडली विश्लेषण
• जन्मकुंडलीवर पंचांगाचे थेट परिणाम
• तत्त्वबळ ओळखण्याची पद्धत
• पंचांग–तत्त्वांवर आधारित व्यक्तिमत्त्व अभ्यास
• केस स्टडी + प्रॅक्टिकल चार्ट अभ्यास

Learning Objectives

हा १०-दिवसीय विशेष वेबिनार अभ्यासक्रम पंचतत्त्व आणि पंचांग या वैदिक ज्योतिषाच्या दोन मूलभूत स्तंभांवर आधारित आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना वेळ (Time), ऊर्जा (Energy) आणि अवकाश (Space) यांचा जीवनाशी असलेला सखोल संबंध समजून घेण्याची संधी मिळेल.
पंचांग ही केवळ दिनदर्शिका नसून ती निर्णय, कृती, मानसिक अवस्था आणि जीवनप्रवाह यांना दिशा देणारी एक वैज्ञानिक वैदिक प्रणाली आहे. त्याचप्रमाणे पंचतत्त्वे ही मानवी शरीर, मन आणि चेतना यांची रचना स्पष्ट करतात.
हा अभ्यासक्रम नवशिक्यांपासून ते अभ्यासू साधकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असून, सिद्धांतासोबत प्रॅक्टिकल समज, चार्ट अभ्यास आणि केस स्टडी यांचा समावेश आहे. कमी शुल्कात, सखोल आणि शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे.

Requirements

  • या वेबिनारमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी स्पष्टपणे समजून घेऊ शकाल:
  • ज्योतिष शास्त्राचा खरा अर्थ आणि त्रिकालज्ञानाची संकल्पना
  • Qualitative Time म्हणजे वेळेची गुणवत्ता ओळखण्याची वैदिक पद्धत
  • पंचांगाचे वैदिक, दैनंदिन आणि व्यवहारिक उपयोग
  • ग्रेगोरियन कॅलेंडर आणि भारतीय पंचांग यांतील मूलभूत व वैज्ञानिक फरक
  • पंचतत्त्वे (आकाश, वायु, अग्नी, जल, पृथ्वी) यांचे
  • मानसिक
  • ऊर्जात्मक
  • आध्यात्मिक परिणाम
  • जन्मकुंडलीतील पंचतत्त्वांचे संतुलन कसे ओळखावे
  • वार, तिथी, नक्षत्र, करण आणि योग यांचा
  • व्यक्तिमत्त्वावर
  • निर्णयक्षमतेवर
  • दैनंदिन कृतींवर होणारा प्रभाव
  • शुभ–अशुभ योगांचा योग्य वापर कसा करावा
  • पंचतत्त्व व पंचांग आधारित कुंडली विश्लेषणाची प्रॅक्टिकल पद्धत
  • केस स्टडी आणि प्रत्यक्ष चार्ट अभ्यासाद्वारे आत्मविश्वास वाढवणे

Curriculum

17 Lessons15h

ज्योतिष शास्त्र म्हणजे काय?

• त्रिकालज्ञान — भूत, वर्तमान व भविष्य यांची समज • Qualitative Time म्हणजेच वेळेची गुणवत्ता ओळखण्याची कला • "ऊर्जा + समय + अवकाश = ज्योतिष" या मूलभूत तत्त्वाचा अभ्यास
Panch Tattva & Panchang Muhurt Session (Lesson 1)1:27:22
Panch Tattva and Panchang (Lesson 2)2:00:21
MG Panch Tattva and Panchang (Lesson 3)1:35:32
PRUTHVI TATTVA (Lesson 4)1:31:58
VAYU TATTVA (Lesson 5)1:45:56
Panch Tattva & Panchang- Session-6- Akash Tattva1:56:32
Panch TAttva and Panchang- Lesson-7- Panchang-11:27:34
Panch Tattva & Panchang- Lesson-8-Panchang-21:58:26
PANCH TATTVA & PANCHANG- LESSON-9- TITHI-21:56:32
PANCH TATVA AND PANCHNAG- LESSON-10- KARAN1:40:35
PANCH TATTVA AND PANCHNAG-LESSON-11-YOG-146:46
PANCH TATTVA AND PANCHANG-LESSON-11-YOG-1.218:38
PANCH TATTVA AND PANCHANG-LESSON-12-YOG-21:30:57
PANCHA TATTVA & pANCHANG- LESSON-13-NAKASHTRA-11:41:13
PANCHA TATTVA & PANCHNAG- LESSON-14-NAKSHTRA-21:33:19
PANCHA TATTVA AND PANCHANG- LESSON-15-NAKSHTRA-31:49:45
PANCHA TATTVA & PANCHANG-LESSON-16- NAV TAARA CHAKRA1:25:19

Earn a certificate

Add this certificate to your resume to demonstrate your skills & increase your chances of getting noticed.

selected template

Your Instructors

manipushppak

5.0/5
2 Courses
21 Reviews
42 Students
See more

Student Feedback

5.0
16 Ratings
100%
0%
0%
0%
0%

Reviews (16)

माया मॅडम तुमच्यासारखे गुरू लाभले हे आमचे भाग्यच आहे, तुम्ही ज्योतिष हा अथांग समुद्रासारखा असलेला विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवला आहे ,तुमच्या ओघवत्या वाणीतून खूपच छान माहिती दिली आहे .मॅडम तुम्ही कायम आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा आणि तुमचे अडीच अजून उत्तमोत्तम कोर्स व्हावे हीच श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते .

आपण खूप ऐकतो की पंचांग बघितले आणि मग ठरवले…..पण खरा पंचांगाचा अर्थ आणि ते कसे आपल्या जीवनाशी संबंधित आहे हे आणि ते सुद्धा शास्त्राच्या आधारे कसे ….हे ज्याला गळी उतरवता आले त्या म्हणजे “मायाताई “. मी खूप आभारी आहे की मी एक त्यांची शिष्या बनले आणि मला हे सर्व कळले. अत्यंत सोप्या शब्दात सांगितलेले हे पंचांगाचे अंतरंग मला आजही आठवते. मी विनंती करते ज्यांना या ची सधी मिळेलं त्यांनी हा कोर्स नक्की करावा. थैंक यू माया ताई 👩

Maya madam has deep understanding of the subject. Her teaching skill & style is very unique. The complicatee subject like Panchang & Panchatatva she taught us in very simple, effective & the most important sciebtific way.
Thank you so much mam for giving this knowledge.
Really greatfull for having teacher like you.

Regards,
Ashwini.

माया मॅडम माझ्या ज्योतिष प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांनी मला नक्षत्र ज्योतिष आणि पंचांग यांसारख्या गूढ आणि सखोल विषयांचे ज्ञान अतिशय सोप्या, स्पष्ट आणि प्रभावी पद्धतीने दिले.nत्यांच्या शिकवण्याची खासियत म्हणजे त्या केवळ माहिती देत नाहीत, तर प्रत्येक गोष्टीमागील तत्त्वज्ञान, अर्थ आणि जीवनातील उपयोग अगदी समजेल अशा पद्धतीने उलगडून सांगतात. त्यामुळे शिकलेले ज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहत नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनात वापरता येते.nमाया मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या ज्योतिषाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात एक मोठा सकारात्मक बदल झाला आहे. त्यांच्या शिकवणीत संयम, सखोलता आणि आत्मिक स्पर्श आहे, जो प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्यास प्रेरित करतो.n🙏 मनापासून धन्यवाद मॅडम, आपण दिलेल्या ज्ञानासाठी आणि सतत मार्गदर्शनासाठी. आपल्यासारखी गुरु लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच एक मोठी भाग्याची गोष्ट आहे.n🌟 आपण असेच अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळवत राहा हीच सदिच्छा!

Maya Madam has very good knowledge, and it shows in her teaching. She teaches with full dedication. It is rare to find such a detailed course on Panchang. The course covered many topics well. I learned many things. Thank you, Maya Madam.

मॅम तुमचं शिकवण अप्रतिम आहे तुम्ही शिकवत असतात तर तुमचं ऐकण्यामध्ये मन इतके हरपून जाते की तुमचं लेक्चर संपू नये वाटत .तुमच्याकडे असल्याले अमूल्य ज्ञान आम्हाला मिळत जावो

🌹।।श्रीरामसमर्थ।।🌹nnपंच तत्व आणि पंचांग म्हणायला अगदी साधा कन्सेप्ट वाटतो पण ज्या प्रकारे मायाताईंनी इतक्या खोलात जाऊन एकेक लेयर्स उलगडले आहेत की आपण अचंबीत होतो पंचमहाभूतं आणि पंचांगाची पाच अंग त्यांची काही कँनेक्टिव्हिटी असू शकते हेच सामान्य जातकाला माहीत नसतं ...nपण मायाताईंनी एक चंगच बांधला आहे की प्रत्येक घरात पंचांगाची माहिती असणारी एक व्यक्ती हवी त्यानुसार जरी आपण दैनंदिन निर्णय घेतले तरी आयुष्यातील अवघड गोष्टी कशा सोप्या होती हे पूर्ण सतरा भागांमध्ये इतकं तळमळीने शिकवलं आहे ... nइतके चार्ट, इतके टेबल्स किती किती म्हणून डिटेल अभ्यास ..nआपल्याला कळावा म्हणून प्रत्येक पैलूंची अथ पासून इति पर्यंत माहिती आणि त्या अनुषंगाने येणारी जीवनमूल्य त्यांचं महत्व ...nnतिथी वार दोष याबद्दलची मूळ अडचण ज्योतिष शास्त्रापेक्षा पंचांग अंगानेच कळू शकतो याचा उदाहरणासहीत स्पष्टीकरण ...nपंचांग रोज का बघायचं... प्रत्येक काळाच्या त्या त्या पैलूंची फलश्रुती समजून ते बघत गेलं की आपोआपच एक जिज्ञासा तयार होते आणि आपण या विषयाच्या अभ्यासाकडे ओढले जातो ...nवैचारिक दृष्टी मायाताईंच्या मार्गदर्शनाने अधिक व्यपाक होतेच त्यांचं त्या विषयाशी इतकं एकरूप होत समर्पित होणंही आपण अनुभवतो ...nnत्यांचा त्यांच्या गुरूजनांबद्दलचा आदर क्षणोक्षणी व्यक्त होत असतो nवार तिथी नक्षत्र करण आणि योग हे पूर्वी आठवावे लागायचे पण आता त्यांचं अनन्य महत्व मायाताईंच्या सूक्ष्म अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने इतकं आतून कळलं आणि पटलंहीn🌹मायाताई कोटीवाले🌹nहे एक अजब असामान्य रसायन आहे ज्योतिष शास्त्र हे त्यांनी खरच त्या म्हणतात तसं खाते पिते जेवते झोपते (हे अक्षरशः खरं आहे ...)असं म्हणत कोळून प्यायलंआहे ...nnदीड दीड तास लेक्चर तेही कसलं scripting नाही फक्त ठरवलेला शिकवण्याचा विषय विद्यार्थ्यांना सोपा जावा म्हणून खुप अथक परिश्रम करून बनवलेल्या अभ्यासपूर्ण ppt आणि त्या अनुषंगाने उदाहरण म्हणून काही पत्रिका ... इतकंच साहित्य घेत त्यांच्याकडून येणारं फ्लॉलेस ज्ञान इतकं सहज प्रवाही होतं ...nआपण स्थलकाल विसरतो...nसगळं काही जिथल्यातिथे ...nnकधीकधी फार अपराधी वाटतं की इतक्या अधिकारी व्यक्तीकडून शिकण्यात आपण कमी पडतो की काय पण त्या सतत धीर देत असतात इतक्यात नाही काही कळणार...nपुन्हा पुन्हा ऐका रेकॉर्डिंग.. nकळेल नक्की काही दिवसांनी..nnमाया ताई यु आर ऍन एक्सट्रॅक्ट ऑफ एव्हरी नॉलेज यु हॅव रिसिव्हड ... !!nnआणि ते ज्ञान इतरांना हातचं न राखून ठेवता असं भरभरून उपलब्ध करून देता आहात ... nयांचं ज्योतिष शास्त्रातील प्रत्येक कळलेला पैलू त्या रिअल लाईफ मध्ये कोरिलेट करणं आपल्याला थक्क करतं nnआठवड्याची सुरवात रविवार पासून केली पाहिजे ...या सध्या तथ्याच्या मागे किती मोठा अर्थ दडला आहे हे ऐकून आपण अवाक होतो...nnमायाताई ज्योतिष शास्त्रातील प्रत्येक आस्पेक्ट शिकवताना वर्तमानाचं भान जपत आपले एकेक कन्सेप्ट इतके क्लीअर करतात की बस्स...nnकित्येक साध्यासुध्या गोष्टीतील आपणच कधी गृहीत धरण्यातून कधी सवयीतून तर कधी अज्ञानातून निर्माण झालेले सगळे संभ्रम कायमचे मिटतात nnया विषयातील एकेका पैलू मागे इतक्या पुराणकथा त्यांच्या अशा propmptly येतात की शंका किंतु परंतु ला जागाच नसते ...nपुरवलेलं सगळं ज्ञान जिथल्यातीथे कायमचं फिट्ट ....nखरच त्यांचा या सगळ्यांबाबतीतला अनुभव घ्यायचा असेल तर त्यांचा एक हिंदी पॉडकास्ट आहे तो नक्की अनुभवाnnThe Manav Shownया चॅनेल वरील पॉडकास्ट नक्की बघा इथे लिंक पण देऊन ठेवते..nnhttps://youtu.be/fJgzgkNbkksi=z87frbPoBAWmRzu0

नमस्कार मॅडम, तुम्ही ज्योतिष शास्त्राच्या खूपच उत्तम शिक्षिका आहात. तुम्ही अगदी मनापासून, खूप छान शिकवता. पंचांगाचे, पंच तत्त्वाचे मार्गदर्शन तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या केले, अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला समजाऊन सांगितले त्याबद्दल धन्यवाद, मॅडम तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.💐

Thank you Maya Ma'am, your classes are genuinely worth and we learn lot of new things in every class not yet taught by anyone. I never knew through Panchanga that predictions could be made, but after attending your in-depth course, I was able to visualize the problems that could be faced by individuals coming into certain Tithi/Waar/Yoga/Nakshatra/Karana. Would recommend others to join an understand basics before diving deeper into the Kundali aspects of predictions. Thank you again Ma'am!

Mam panchang mai bhi itna detailing mai apne shikhaya hai or easy way mai samaj mai asani se aa jata hai or panchag itna detail mai hota hai ye muje pata nahi tha karan ,yog,thithi ,var, nakshatra ye or panch tatva se jodte hai ye mare liye sab Naya tha lekin muje easylu samaj mai aa gaya ke kabhi questions rahata ho nahi .mai sabhi chote chote course karti thi fir panchag kar ne ke bad muje apka padhane ka jo tarika hai or itni sari kundliya or bhavat bhavam ye sab kitab mai padha tha to samaj mai nahi aata tha lekin apne jis tarah se shikhaya hai Madam truly dil se thank you very much Great guru

मॅडम, प्रथम तुम्हाला कोटी कोटी वंदन, 🙏 पंचतत्व आणि पंचांग हा विषय तुम्ही अतिशय सविस्तर ,तळमळीने आणि अतिशय सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितला .यापूर्वी मला पंचांगा बद्दल काहीही माहिती नव्हते परंतु आपल्या सखोल ज्ञानामुळे व ओघवत्या शैलीमुळे मला याचे संपूर्ण ज्ञान मिळाले,
आपण अतिशय जाणकार पंडित ज्योतिषाचार्य आहात आणि माझ्यासाठी तुम्ही एक उत्तम गुरू आहात, खूप धन्यवाद मॅडम🙏🌹

माया मॅडम खूप छान शिकवतात आणि हे एक चांगला ज्योतिषशास्त्र चा क्लास आहे. धन्यवाद मॅडम 🙏🙏

नमस्कार मॅडम
मॅडम खूपच छान मिळाली या कलासमध्ये आपण या कलासमध्ये काय शिकणार यापेक्षा ही जास्तीची माहिती तुम्ही या कलासमधून दिली आहे आणि विशेष म्हणजे तुमचं knowlege आणि अध्यात्म याची जोड देऊन तुम्ही जो क्लास घेता त्याला तोड ।
गुरुजवळ ज्ञानाचा भांडार असतो अशी तुमचं व्यक्तिमत्त्व आहे ।तुमच्या प्रत्येक कलासमध्ये विद्यार्थ्यांना आणखी किती जास्त माहिती देता येईल ही तळमळ दिसून येते कमी फी मध्ये खूप ज्ञानदान।
पंचांग आणि तत्व याची सांगड घालून आपण कसे predict करू शकतो तसेच तत्व एवढं खोल असत हे आपल्या वर्गामध्ये कळलं।

खुप खूप धन्यवाद मॅडम

write review of panchang class on manipushpak website write the teacher is very talented and very supportive also has deep knowledge of Astrology it is worth to learn from her
Here is a review based on your request, structured for the Manipushpak website or related social media platforms.
⭐ Highly Recommended: Deep Knowledge and Supportive Teaching!
I recently completed the Panchang class on the Manipushpak website, and it was a truly transformative experience. The teacher Maya ma'am is incredibly talented and possesses profound, in-depth knowledge of Astrology, particularly in how to read and interpret the Panchangam accurately.
What sets this course apart is the teacher’s teaching style—she is very supportive, patient, and ensures that every student understands the foundational concepts (Tithi, Vara, Nakshatra, Yoga, and Karana) before moving ahead. She answers all queries with great detail and connects ancient wisdom with practical, modern-day applications.
Whether you are a beginner or looking to advance your skills in Muhurta or predictive astrology, it is absolutely worth learning from her. Her dedication to sharing authentic knowledge is commendable. Thank you, Manipushpak, for such a wonderful learning opportunity!
Rating: 5/5

मॅडम... पंचांग हा इतका किचकट विषय परंतु nइतके सुंदर मार्गदर्शन मी कधीही कोणाकडूनही अनुभवले नव्हते. सोपी सरळ ओघवती भाषा आणि किती सरळ काहीही राखून न ठेवता शिकवणे.... तुम्हाला कोटीकोटी वंदन...nनक्षत्र, नवमांश वर्गाच्या प्रतीक्षेत आहोत कारण तुमच्या कडूनच शिकायचे आहे. nतुम्ही म्हणजे ज्ञानाची वाहती गंगा आहात... ओंजळीत भरून घेतोय आम्ही 🙏

Maya ji is a wonderful mentor.
I would highly recommend her name to my friends and family.

ChatGPT Image Dec 16, 2025, 04_00_21 AM

999.002,500.00

60% off
Level
Intermediate
Duration 15 hours
Lectures
17 lectures
Subject

Course categories

Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare

Don't have an account yet? Sign up for free

No apps configured. Please contact your administrator.
No apps configured. Please contact your administrator.